आंतरराष्ट्रीय योग दिवस देशोदेशी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. युकेमधे लंडन शहरातल्या महत्त्वाच्या स्थळांवर तसंच ऑक्सफोर्ड केंब्रिज आणि साऊदम्टन विद्यापीठांमधे विविध कार्यक्षेत्रातल्या लोकांनी योगदिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतला.
आरोग्य, एकाग्रता आणि शाश्वतता या तत्त्वांचं महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम झाल्याचं युकेतले भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे.
अमेरिकेत न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर मधे योगदिन साजरा झाला. जपानमधे टोकियो इथल्या त्सुकिजी होंग्वानजी बौद्ध मंदिरात आयोजित योगसाधना कार्यक्रमाचं उद्घाटन जपानी प्रधानमंत्र्यांच्या पत्नी शिगेरु, इशिबा, योशिको इशिबा यांच्या हस्ते झालं. सिंगापूरमधे समुद्रकिनारे, उद्यानं आणि विशाल वृक्षांच्या छायेत योगसाधकांनी हजेरी लावली.
म्यानमां मधे मंडाले इथं भारतीय दूतावासातर्फे आयोजित कार्यक्रमात सुमारे ७०० योगसाधकांनी भाग घेतला. फिजी, पापुआ न्यू गिनी, आणि टोंगा इथंही योगदिन साजरा झाल्याचं वृत्त आहे.