आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं २१ जून रोजी भुसावळ रेल्वे स्थानकासमोरच्या रेल्वे क्रीडांगणावर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचं आयोजन आयुष मंत्रालय, केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय, मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे.