डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशभरात एक लाखाहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम होणार

  यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या २१ तारखेला सकाळी साडे सहा ते ७ वाजून ४० मिनिटं या वेळेत एक लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी – एक स्वास्थ के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखा पट्टणम इथे होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील.

 

त्यांच्यासह सुमारे ४० देशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी महिती जाधव यांनी दिली. यंदा साजऱ्या होणाऱ्या या विशेष योग संगमासाठी देशभरातल्या ६५ हजारांहून अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे. दिल्लीत लाल किल्ला, कर्तव्य पथ आणि लोढी बाग यासह १११ ठिकाणी योगदिन साजरा करण्यात येणार आहे, असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं. 

 

   दरम्यान, प्रतापराव जाधव यांनी भारत आणि जगभरात योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांविषयीची माहिती एका विशेष मुलाखतीतून दिली आहे. विकसित भारत का अमृत काल : सेवा, सुशासन, गरीब कल्याण के ११ साल’ या विशेष मालिकेचा भाग म्हणून, ही विशेष मुलाखत आज रात्री साडे नऊ वाजता आकाशवाणी एफएम गोल्ड वाहिनी आणि संपूर्ण आकाशवाणी नेटवर्कवर प्रसारित केली जाईल.