सौदी अरेबियाने आज पहाटे येमेनमधल्या मुकाल्ला या शहरावर बॉम्बहल्ला केला. संयुक्त अरब अमिरातीच्या पूर्व किनाऱ्यावरच्या फुजैरा या बंदरातून मुकाल्ला बंदरात आलेल्या जहाजांवरून शस्त्रास्त्र उतरवली गेली. याचा सुरक्षेला आणि स्थैर्याला धोका असल्यामुळे हा हल्ला केल्याचं सौदी अरेबियाच्या लष्करानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यांनंतर येमेनच्या हौथी-विरोधी लष्करानं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे.