गेलं वर्ष हे विविध क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रासाठीही असामान्य वर्षं ठरलं. जागतिक स्तरावर भारताच्या उदयाचा निर्णायक अध्याय म्हणून या वर्षाकडे पाहिलं जाईल. आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय उलथापालथ आणि सत्तेच्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये स्थैर्य देणारं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आले.
(जागतिक व्यापारातल्या अस्थिरतेसाठी ओळखलं जाणारं २०२५ हे वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारं होतं. आणि देशांतर्गत निर्णायक नेतृत्वापासून ते परदेशातल्या मुत्सद्देगिरीपर्यंत त्यांनी त्या कसोट्या पार केल्या आणि जागतिक पातळीवर आदर मिळवला. ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी आपल्या राष्ट्रप्रथम या भूमिकेवर ठाम राहिले आणि व्यापार करारांसाठी आणलेला दबाव भारताने धुडकावून दिला. त्याखेरीज भारताने धोरणात्मक व्यापारी करार करून आपलं भविष्य सुरक्षित केलं. भारत-यूके आणि भारत ओमान या दरम्यान झालेल्या करारांमुळे भारतीय वस्तुंना पश्चिम आणि आखाती देशांमध्ये शुल्कमुक्त प्रवेश झाला. न्यूझीलंडबरोबर झालेल्या करारामुळे भारताची करमुक्त निर्यात सुनिश्चित झाली. जागतिक अंदाजांना खोटं ठरवत भारतीय अर्थव्यवस्थेत सकल राष्ट्रीय उत्पादनाने यंदा ८ पूर्णांक २ दशांश टक्के इतकी वाढ नोंदवली.)