November 14, 2024 8:16 PM

printer

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.