डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्यपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्काराज याच्यासोबत होईल. कार्लोस यानं नोव्हाक जोकोविचवर ६-४, ७-६, ६-२ असा विजय मिळवला.

महिला दुहेरीत गॅब्रिएला दाब्रोवस्की आणि एरिन राऊटलिफ यांनी अग्रमानांकित कॅटरीना सिनियाकोव्हा आणि टेलर टाऊनसेंड या जोडीवर ६-४, ६-४ अशी सहज मात करून अजिंक्यपद पटकावलं. तर मिश्र दुहेरीत सारा एरानी आणि अँड्रिया वावासोरी यांनी इगा श्वियांतेक आणि कॅस्पर रूड या जोडीवर विजय मिळवून अजिंक्यपद कायम राखलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत आज मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होराशियो झेबालोस ही जोडी जो सॅलिसबरी आणि नील स्कूपस्की यांच्याविरुद्ध लढत देईल. 

तर महिला एकेरीत आज मध्यरात्री होणाऱ्या सामन्यात अमांडा अनिसिमोव्हा आणि अग्रमानांकित अरीना साबालेंका एकमेकींविरुद्ध मैदानात उतरतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.