जागतिक वुशु स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारताच्या नम्रता बत्राची ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील चेंगडू इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत वुशू मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकून नम्रता बत्रा हिनं इतिहास रचला आहे. फिलिपिन्सच्या क्रीझान फेथ कोलाडोवर दमदार विजय मिळवत नम्रतानं अंतिम फेरीत प्रवेश करुन पदक निश्चित केलं. मात्र मेंगुई चेन बरोबर सुवर्णपदकासाठी झालेला सामना नम्रताला 0-2 असा गमवावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.