WTT Star Contender Table Tennis: पुरुष एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात

चेन्नई इथं सुरु असलेल्या डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. उपांत्य फेरीत भारताचा अव्वल मानांकित मानव ठक्कर याला फ्रान्सच्या बिगर मानांकित थिबॉल्ट पोरेट याच्याकडून पराभव पत्करावा लागला. थिबॉल्ट यानं मानवचा  १० – १२, ९ – ११, ११ – ७, ७-११ असा पराभव करत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.  आता अंतिम फेरीत त्याची लढत दक्षिण कोरियाच्या ओह जून सुंग याच्यासोबत होणाल आहे.

 

मानव यानं काल दक्षिण कोरियाच्या लिम जोंग याच्यावर विजय मिळवून, तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

 

दरम्यान महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी मिवा हरिमोटो आणि होनोको हाशिमोटो या दोन जपानी खेळाडूंमध्ये सामना होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.