डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 14, 2025 1:36 PM | WTC Final

printer

दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर

जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. सामन्याचा दोन दिवसांचा खेळ अजून शिल्लक असून, दक्षिण आफ्रिका आपल्या दुसऱ्या डावात विजयापासून केवळ ६९ धावा दूर आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर रोखला.

 

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं ७४ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी २८२ धावांचं लक्ष्य मिळालं. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रिकल्टन अवघ्या सहा धावा करून माघारी परतला. मात्र त्यानंतर शतकवीर एडन मार्करम यानं आधी मल्डर याच्यासोबत अर्धशतकी, तर त्यानंतर कर्णधार बवुमा सोबत नाबाद शतकी भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं आहे. 

 

तिसऱ्या दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेनं २ बाद २१३ धावा केल्या असून मार्करम १०२ आणि बवुमा ६५ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा