विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू

महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा २०२६ विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीला मोठी बोली मिळताच युपी वॉरियर्जने राईट टू मॅच कार्ड वापरून तिला तीन कोटी २० लाख रुपयांत संघात कायम ठेवलं. दीप्ती शर्मा डब्लुपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली असून, स्मृती मानधनाच्या फक्त २० लाख रुपयांनी मागे आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक संघात दमदार कामगिरी करणाऱ्या श्रीचरणी आणि लॉरा वोल्वार्ड्ट यांनाही या लिलावात मोठी बोली मिळवली आहे.