महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या कालच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ३ खेळाडू राखून विजय मिळवला. नवी मुंबई इथं झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करताना मुंबई संघानं निर्धारित २० षटकांत ६ खेळाडू गमावून १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं २० षटकांत ७ खेळाडूंच्या मोबदल्यात १५७ धावा फटकावल्या आणि सामना जिंकला. या स्पर्धेत आजचा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या संघांदरम्यान नवी मुंबईत रंगणार आहे.
Site Admin | January 10, 2026 12:26 PM | WPL
WPL: RCB संघाचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ३ खेळाडू राखून विजय