दिव्यांगांच्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या टी–12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं २४ पूर्णांक ४६ सेकंदांत धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला. कोलंबियाच्या पेरेझ लोपेझ आणि ब्राझीलच्या बारोस दा सिल्वा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली.
भारताची एकूण पदकसंख्या आता १९ झाली आहे.