July 8, 2024 7:03 PM

printer

वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहा यांना जामीन मंजूर

मुंबईच्या वरळी भागात झालेल्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शहा यांना मुंबईतल्या एका न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मिहीर शहा अद्याप फरार आहे. मिहीर याने रविवारी सकाळी बीएमडब्ल्यू चालवताना एका जोडप्याच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात कावेरी नखवा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप जखमी झाले. अपघातानंतर मिहीर फरार झाला. त्याला पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.