डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आज जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन आज जगभरात सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये  आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये  पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा ही या दिवसाचा उद्देश आहे.  पर्यटन मंत्रालयातर्फे  आज नवी दिल्ली इथं जागतिक पर्यटन दिन  साजरा करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती  जगदीप धनखड या कार्यक्रमाला संबोधित करतील. या प्रसंगी मंत्रालयातर्फे  सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.