डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया – दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत

जागतिक कसोट क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी, आज लंडनमधे लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना सुरु झाला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीच्या फळीतले फलंदाज झटपट बाद होत गेले. उपाहारापर्यंत त्यांनी ४ गडी गमावून ६७ धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजाला तर भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्यानंतर स्टीव्हन स्मिथनं ब्यू वेबस्टरच्या साथीनं डाव सावरला. स्मिथ ६६ धावा करुन बाद झाल्यानंतर वेबस्टरनं दमदार फलंदाजी सुरु ठेवली. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियानं ५ बाद १९० धावा केल्या.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा