आज जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन

आज जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन आहे. दरवर्षी 24 मार्च रोजी क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 1882 मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोग अर्थात टीबीच्या जीवाणूंचा शोध लावला होता. त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस पाळला जातो.