जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : महिला दुहेरीत भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत दिया पराग चितळे आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत जपानच्या साकुरा योकोई आणि सात्सुकी ओडो या जोडीनं त्यांचा ३ – ० असा पराभव केला.