जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदकासह २२ पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेत शंभर देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. भारतीय खेळाडूंची कामगिरी देशातल्या असंख्य लोकांना प्रेरणादायी ठरेल, असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी खेळाडूंना त्यांच्या भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Site Admin | October 6, 2025 8:24 PM | World Para Athletics Championships
जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २२ पदकं