मानसिक आरोग्य दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य अशी या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे.
हा दिवस भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची आठवण करून देतो असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती वाढवण्याची आणि खुलेपणानं संवाद साधण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.