पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी तामिळनाडूमधील कोईमबतूर इथं जागतिक हत्ती दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केला गेलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसंच तामिळनाडू वन विभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात हत्तींचं संवर्धन, मानव हत्ती संघर्ष सोडवणे या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
Site Admin | August 12, 2025 9:31 AM | World Elephant Day
आज ‘जागतिक हत्ती दिवस’
