डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताचा विकासदर ६.३ % राहण्याचा अंदाज

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, भारत ही जगातील जलदगतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात त्याचा विकासदर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे यामध्ये काहीसा फरक होऊ शकतो, असं ही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अर्थतज्ञ इन्गो पिटरले यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये अपेक्षित असलेली वाढ ही खाजगी खरेदीदारी आणि सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार, भारताचा विकासदर पुढील वर्षी थोडा वाढून 6 पूर्णांक 4 दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याउलट जागतिक विकासदर 2025 मध्ये फक्त 2 पूर्णांक 4 दशांश टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे, व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चितता यामुळे हा दर कमी राहणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.