January 20, 2026 1:39 PM

printer

दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे विविध कंपन्याबरोबर साडेचौदा लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्याबरोबर विक्रमी साडेचौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याअंतर्गत स्वाक्षरी केलेल्या १९ सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये १५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. 

 

करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र २०४७: व्हिजन आणि पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहेत, असं राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

 

यावेळी राज्य शासनाने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि. यांच्याबरोबर चार हजार कोटी रुपयांचा करार, लोढा डेव्हलपर्स लिमिटेड बरोबर एक लाख कोटी रुपयांचा करार, अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्ल्सबर्ग यांच्याबरोबर ५०० कोटी रुपयांचा करार, विदर्भात पोलाद क्षेत्रात सुरजागड इस्पात लिमिटेड बरोबर २० हजार कोटी रुपयांचा करार, तर लॉजिस्टिक्स क्षेत्रात एमएमआरडीए आणि एसबीजी ग्रुप यांच्यात २० अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला.