January 19, 2026 1:43 PM | World Economic Forum

printer

जागतिक आर्थिक मंचच्या परिषदेला आजपासून दावोस इथं प्रारंभ

जागतिक आर्थिक मंचची बैठक आज स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू होत आहे. या ५६व्या वार्षिक बैठकीला ३ हजारहून अधिक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. या पाच दिवस चालणाऱ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी १०० हून अधिक भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारी शिष्टमंडळ दावोसमध्ये दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी आणि के. राममोहन नायडू यांच्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री विविध देशांच्या गुंतवणूकदारांसमोर आपापल्या राज्यांचे सादरीकरण करतील. कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि तेलंगणासह विविध राज्य सरकारांच्या कामाची माहिती देणारे प्रदर्शनात सहभागी होतील.