अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा

भारतात होणाऱ्या अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली आहे. खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. दीपिका टी. सी. कडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून गंगा एस. कदम उप-कप्तान असेल.