डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत जस्मिन लँबोरियाची सुवर्ण पदकाला गवसणी

ब्रिटनमध्ये लिव्हरपूल इथं झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या जस्मिन लँबोरियानं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जस्मिननं अंतिम फेरीत पोलंडच्या जूलिया सेरेमेटाला ४-१ नं पराभूत केलं. भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत एकूण तीन पदकं जिंकली. ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या नुपूर श्योराणला पोलंडच्या अगाता काझ्मार्स्कानं ३-२ असा पराभूत केलं त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर पूजा राणीनं कांस्य पदक पटकावलं. मात्र, पुरुष खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही.