डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 20, 2025 9:02 PM | World Boxing Cup 2025

printer

विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना सुवर्ण पदक

उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अरूंधती चौधरी, प्रीति पवार, मीनाक्षी हुदा आणि नुपुर शेरॉन या भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. ७० किलो वजनी गटात अरूंधतीनं उझबेकिस्तानच्या अझिजा झोकिरोवाचा ५-० असा सपशेल पराभव केला. प्रीतिनं ५४ किलो वजनी गटात इटलीच्या सिरीन छाराबीचा ५- ० असा धुवा उडवला. मीनाक्षीनं ४८ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या फोझिलोवा फरझोनाला ५-० असं सहज पराभूत केलं. नुपूरनं ८० किलोहून अधिक वजनी गटात उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिमबोवाला नमवलं. एकीकडे महिलांनी भारताला चार सुवर्णपदकं मिळवून दिली तर भारताचे चार मुष्टियोद्धे अंकुश पांघल, अभिनाष जामवाल, पवन बर्तवाल आणि जादुमणि सिंग हे अंतिम सामन्यांत हरल्यामुळे भारताला चार रौप्यपदकांवर समाधान मानावं लागलं.