World Boxing Cup 2025 : भारताच्या हितेश गुलियाला सुवर्णपदक

ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं. हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला. भारताच्याच अभिनाश जामवालया यानं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत अभिनाशला ब्राझीलच्या युरी रीसकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. याआधी काल पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या मनीष राठोड यानं कांस्य पदकाची कमाई केली.