५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सव आजपासून भारत मंडपम इथं सुरू झाला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. प्रकाशक, लेखक, वाचक आणि सांस्कृतिक वर्तुळाचे प्रतिनिधी ९ दिवसांच्या या महोत्सवात एकत्र येत आहेत. ३५ देशांमधल्या १ हजारापेक्षा जास्त प्रकाशकांनी यात भाग घेतला आहे. विविध विषयांवरची असंख्य पुस्तकं इथं वाचकांसाठी उपलब्ध आहेत. यंदा या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना, ‘भारताचा लष्करी इतिहासः शौर्य आणि बुद्धिमत्तेची ७५ वर्षं’ अशी आहे. या विशेष दालनात या संकल्पनेशी संबंधित ५०० पेक्षा जास्त पुस्तकं आणि शंभरपेक्षा जास्त कार्यक्रम नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
Site Admin | January 10, 2026 1:19 PM | World Book Fair 2026
५३वा नवी दिल्ली जागतिक पुस्तक महोत्सवाला सुरुवात