डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 26, 2025 8:36 PM | World Bank

printer

गेल्या दहा वर्षात देशातले १७ कोटींहून अधिक नागरिक गरीबीमुक्त झाल्याचा जागतिक बँकेचा अहवाल

देशातल्या  दारिद्रय रेषेखालील नागरिकांची संख्या कमी होत असून गेल्या दहा वर्षात भारतानं १७ कोटी १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. भारतीय नागरिकांच्या आर्थिक स्तरात सुधारणा झाली असल्याचं जागतिक बँकेच्या ‘स्प्रिंग-२०२५’ च्या अहवालात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये अति गरिबीच्या स्तरात सुधारणा झाली असून २०११-१२ मध्ये १८पूर्णांक चार दशांश टक्के असलेला गरिबीचा दर २०२२-२३ या आर्थिक वर्षात दोन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे.