डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६.३ % राहिल – जागतिक बँक

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहिल असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचा मान भारत या आर्थिक वर्षातही कायम ठेवेल, असं जागतिक बँकेनं म्हटलंय. 

 

गेल्या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास दर कमी झाल्यानं देशाच्या आर्थिक वृद्धी दरात अपेक्षित वाढ झाली नाही. पण बांधकाम आणि सेवा क्षेत्राच्या विकासात वाढ झाली. ग्रामीण भागात मागणी वाढल्यानं कृषी क्षेत्राच्या वृद्धी दरात वाढ झाल्याचं जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स रिपोर्ट अहवालात नमूद केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा