कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्यासाठी जागतिक बँकेची मंजूरी

कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्याचं नियोजन असून त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातील सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे.

 

तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.