2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला असून, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल अस ही जागतिक बँकेने म्हंटल आहे. यापूर्वी जून मध्ये जागतिक बँकेने भारताचा विकास दर 6 पूर्णांक 3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. जी एस टी सुधारणांचा झालेला सकारात्मक परिणाम, नागरिकांची वाढलेली क्रयशक्ती, ग्रामीण भागातील आर्थिक विकास आदि कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. मात्र 2027 मध्ये अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टेरिफमुळे हा विकास दर कमी होऊन 6 पूर्णांक 3 टक्के राहण्याचा अंदाज ही जागतिक बँकेने वर्तवला आहे.
Site Admin | October 8, 2025 10:05 AM
2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज
