June 26, 2024 5:35 PM | Drug Abuse

printer

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि तस्करीबाबत जनजागृतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २६ जून हा दिवस अमलीपदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे.’पुरावा स्पष्ट आहे

 

प्रतिबंधच आवश्यक आहे” ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाने या दिनाचं औचित्य साधून गेल्या १२ जून पासून नशामुक्त भारत पंधरवडा हा देशव्यापी उपक्रम राबवला आहे. काश्मीरमधे श्रीनगर इथं आज युवा पदयात्रा काढण्यात आली. मणिपूरमधे मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.