देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येमधे महिलांचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं असून २०२३-२४ मधे ते ४२ टक्के झाल्याची माहिती, कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ‘ब्रिक्स’ देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
कौशल्य, पत आणि रोजगार वाढीसाठी राबवलेल्या धोरणांमुळे महिलांचं आर्थिक समावेशन शक्य झालं, सरकारी सेवांमधे कामाचं ठिकाण सर्वसमावेशक होण्यासाठी, महिला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासन अनेक महिलाकेंद्रित उपक्रम राबवत आहे, असंही कामगार आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.