महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.
गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश करण्याच्यादृष्टीनं हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे.