महिला विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. विशाखापट्टणम् इथं दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल. या स्पर्धेत श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धचे सलग दोन सामने भारतानं जिंकले आहेत.
या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 37व्या षटकापर्यंत केवळ 114 धावाच करू शकला.