महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं सुरु असलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या. हरलीन देओलनं सर्वाधिक ४६ धावा केल्या. रिचा घोषनं नाबाद ३५ धावांचं योगदान दिलं.
Site Admin | October 5, 2025 8:19 PM | Women’s World Cup
Women’s World Cup: भारताचं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान