October 1, 2025 9:32 AM | Women’s World Cup

printer

Women’s World Cup : श्रीलंकेचा पराभव करून भारताची विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारतानं ४७ षटकांमध्ये २६९ धावा केल्या. अमनज्योत कौरनं ५७ धावा करून भारताची बाजू मजबूत केली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळं भारताची धावसंख्या २७० अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी २७१ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. मात्र, श्रीलंकेचा संघ ४५ षटकं आणि चार चेंडूंमध्ये सर्वबाद २११ धावाच करू शकला. आता भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यानचा बहुप्रतीक्षित सामना कोलंबोमध्ये रविवारी होणार आहे.