पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. नवी दिल्ली इथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला १३ षटकं आणि ३ चेंडुंमधे फक्त ४१ धावा करता आल्या. भारताने कुशल क्षेत्ररक्षणाच्या बळावर सात गडी धावचीत केले. तर कर्णधार दीपिका टीसी, गंगा कदम आणि जमुना राणी टुडू यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. श्रीलंकेने दिलेलं ४१ धावांचं आव्हान भारताने फक्त ३ षटकांत पार केलं. कर्णधार दीपिका टीसी हिने सलामीला उतरून दमदार फलंदाजी करत १४ चेंडुंमध्ये चार चौकारांसह २६ धावा केल्या, तर अनेखा देवीने तिला १५ धावा करत साथ दिली. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे सहा संघ सहभागी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.