डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 6, 2024 7:49 PM | Women’s T20 WC

printer

महिला टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबई इथं  सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली.

 

स्मृती मंधना आज लवकर बाद झाली. पण शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी डाव सावरला. शेफालीनं ३२, तर जेमिमानं २३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रितनं २९ धावांंचं योगदान दिलं, मात्र ती जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतली, भारतानं ही धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले सात चेंडू बाकी असतानाच पार करत १०८ धावा केल्या.