महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत धडक

महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह येथे खेळला जाणार आहे.