भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत 7 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय महिलांनी केवळ 17 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले, सलामीवीर स्मृती मानधनाने 32 धावा आणि शफाली वर्माने 31 धावांचे योगदान दिलं.
Site Admin | July 10, 2025 9:32 AM | Team India | Women's Cricket
महिला T20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी
