डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 23, 2025 10:07 AM | Women's Cricket

printer

Women’s Cricket : भारताचा इंग्लंडवर २-१ असा विजय

तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा १३ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दमदार फलंदाजी करत, निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३१८ धावा केल्या आणि यजमान इंग्लंडसाठी ३१९ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताची कर्णधार हरमनप्रीतने ८४ चेंडूत १०२ धावा केल्या. या आधी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकल्यानं हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. इंग्लंडच्या संघाला ४९ षटकं आणि पाच चेंडूत ३०५ धावा करता आल्या. भारताच्या क्रांती गौडनं सहा बळी घेतले. हरमनप्रीतच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा