महिला क्रिकेटमधे, भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत, आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवला.
भारतानं नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि त्यांचा डाव ३८ षटकं आणि एका चेंडूत १४७ धावांवर गुंडाळला. स्नेह राणानं ३, दिप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विजयासाठी १४८ धावांचं आव्हान भारतानं २९ षटकं आणि ४ चेंडूत एका गड्याच्या मोबदल्यात पार केलं. प्रतिका रावलनं नाबाद ५०, तर हरनील देओलनं नाबाद ४८ धावा केल्या. स्मृती मंधानानं ४३ धावांचं योगदान दिलं.