डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 24, 2024 7:53 PM | T-20 Women's Cricket

printer

आयसीसी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिजविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत

महिला क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या ५० षटकांमध्ये ५ बाद ३५८ धावा झाल्या. भारताकडून हरलीन देओल हिने सर्वाधिक ११५ धावा केल्या. तर स्मृती मंधाना हिने ५३, प्रतिका रावल हिने ७६ आणि जेमिमा रॉड्रिग्ज हिने ५२ धावा केल्या.

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या  २९ षटकात ४ बाद १४७ धावा झाल्या होत्या.