महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेला आजपासून बिहारमधील राजगीर इथं सुरुवात

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक 2024 स्पर्धेला आजपासून बिहारमधील नालंदा इथल्या राजगीर इथं सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होईल. या स्पर्धा दहा दिवस चालणार आहेत, असं बिहार क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी आकाशवाणी बोलताना सांगितलं.