हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे. आज सकाळी उपान्त्य फेरीत या जोडीनं चीन ताइपेच्या जोडीचा २१-१७, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लिआँग वेई केंग आणि वांग चेंग जोडीशी होणार आहे.
या स्पर्धेत लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम स्पर्धेत मजल मारली. त्याने उपान्त्य फेरीत तैवानच्या छोऊ तिएन चेन याचा २३-२१, २२-२० असा पराभव केला.