डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 29, 2024 7:34 PM | Women Cricket

printer

महिला क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे अहमदाबाद इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सामन्यातला एक चेंडू बाकी असताना २३२ धावांवर आटोपला. ब्रुक हॅलिडेच्या ८६ धावांमुळे त्यांच्या धावसंख्येला आकार मिळाला. भारतातर्फे दीप्ती शर्मानं ३, प्रिया मिश्रानं २, तर सायमा ठाकूर आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. 

शेवटची बातमी हाती आली तेव्हां, भारताच्या २४ षटकात २ बाद १०२ धावा झाल्या होत्या. 

तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघांनी आधीचे एक एक सामने जिंकून बरोबरी साधली असल्यानं आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.