महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रमाचा प्रारंभ

पंचायती राज राज्यमंत्री एस पी सिंह बघेल आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘महिला अनुकूल ग्रामपंचायत’ या उपक्रमाचं उदघाटन केलं. हा उपक्रम पंचायती राज मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ चा एक भाग आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महिलास्नेही ग्रामपंचायत स्थापन करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात विविध मंत्रालयं, विभाग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.